पत्रकारावर हल्ला करणारा नशेबाज गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गांजा ओढण्यास मज्जाव केल्याचा राग मनात धरून पत्रकारावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पसार झालेल्या नशेबाजाला टिळकनगर पोलिसांनी गजाआड केले. मित्राने त्याला केलेल्या गुगल पेवरून पोलिसांनी शिताफीने शोध घेत आरोपीच्या कळंबोलीत मुसक्या आवळल्या.

पत्रकार मोहन दुबे यांच्यावर मंगळवारी नशेबाज वजीर ऊर्फ युसुफ शेख (26) याने प्राणघातक हल्ला केला होता. दुबे यांनी गांजा पिण्यास मज्जाव करून हटकल्याने वजीरला त्याचा राग आला होता. त्याच रागातून त्याने दुबे यांच्या धारदार चाकूने पाठीत भोसकून पळ काढला होता. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल वाघमारे, उपनिरीक्षक विजय देशमुख, पवार व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तेथे सापळा रचून वजीरला टपरीवर सिगारेट ओढण्यासाठी येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.