संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात बुधवार 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

खासदार राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी खासदार राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली. दरम्यान, ‘ईडी’च्या वतीने अॅड. हितेन नेनेगावकर आणि अॅड. कविता पाटील यांनी आज आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्राची प्रत खासदार राऊत यांचे वकील अॅड. विक्रांत साबणे यांना देण्यात आली असून राऊत यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी घेण्याचे आदेश न्या. देशपांडे यांनी दिले.