योगासने करा.. तीक्ष्ण बुद्धी मिळवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसभराचा कामाचा तणाव, थकवा.. बाहेरचे खाणे, व्यायामाचा अभाव या साऱ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. मन स्थिर करण्यासाठी.. मनावरील ताण कमी करण्यासाठी बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी योगासने करण्यासारखा दुसरा उपाय नाही. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही योगासने नियमित केल्यास त्याचा त्वरित परिणाम जाणवू लागतो. पाहूया अशी काही योगासने..
१) ताडासन – कोणत्याही कामात , रोजच्या जगण्यात मन स्थिर असणे आवश्यक आहे. एकाग्रतेमुळे ते शक्य होते. ही एकाग्रता वाढविण्यासाठी ताडासनाचा सराव करावा. यामुळे शासोछवासाची क्षमता वाढते. शरीरातील उर्जेची पातळी वाढते. शरीराची ठेवण सुधारण्यास मदत होते.


2) वृक्षासन – जीवघेणी स्पर्धा, कामाच्या ठिकाणी होणारे मानसिक शोषण, दिवसभराच्या बैठ्या कामामुळे होणाऱ्या शारीरिक वेदना अशा परिस्थितीत वृक्षासन फायदेशीर ठरू शकते. हे असं मानसिक शांतता वाढवते आणि शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करते.
३) अधोमुखश्वानासन – या आसनाच्या सरावामुळे आळस दूर होतो. शरीरातील रक्तप्रवाह वाढतो व सुरळीत होतो. शरीरात लवचिकता येते, उत्साह वाढतो. हात पाय मजबूत होतात. तेच तेच काम करून आळस येतो. कंटाळा येतो. कामाच्या ठिकाणी झोप येते. या आसनाच्या सरावामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. ऑक्सिजन मेदुपर्यंत पोहोचतो आणि एकाग्रता वाढते.
४) धनुरासन – सततच्या बैठ्या कामामुळे कंबर आणि पाठदुखी मागे लागते. या आसनाच्या सरावामुळे पाठ मजबूत होते. कंबरेच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. शरीरात लवचिकता येते.