कोयनाचे चार दरवाजे एक फुटावर, नदीपात्रात 7359 क्युसेकने विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची वरदायिनी असलेले कोयना धरण शंभर टक्के भरले. धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्यानंतर बुधवारी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. आज पाण्याची आवक कमी झाल्याने सहापैकी चार दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून 6309 व पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 असे एकूण प्रतिसेकंद 7359 क्युसेकने कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने बहुतांशी ठिकाणी उघडीप दिली असून, नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 5525 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 105.03 टीएमसी पाणीसाठा आहे. पाणी सामावून घेण्याची क्षमता संपुष्टात आल्याने धरणाच्या चार वक्री दरवाजांतून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.