जम्मू व सांबा जिह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी सकाळी दोन गंजलेले मोर्टार शेल जप्त करण्यात आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. बॉम्ब निकामी पथकाने तत्काळ धाव घेऊन दोन्ही मोर्टार शेल सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केले. सांबा जिह्यातील रिगल सीमेवर गस्तीवेळी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मोर्टार शेल जप्त केला. दोन्ही मोर्टारना गंज लागली होती. यापूर्वी 19 सप्टेंबरला घगवालच्या सुराडा गावात नाल्यातून मोर्टार शेल जप्त केला होता.
























































