शिवभोजन थाळी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच शाळांमधील सरस्वती देवीचे पह्टो कोणत्याही परिस्थितीत हटविणार नाही असे फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमधील सरस्वती देवीचे चित्र हटवा, असे कथित वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता, भुजबळ नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र असे जर कोणी म्हटले असेल तर ते चूक आहे. सरस्वती ही विद्येची देवता आहे. कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती, परंपरा मान्य नाहीत. हिंदुत्व मान्य नाही अशीच व्यक्ती असे बोलू शकते. महापुरुषांचे पह्टो तर लावलेच पाहिजेत. प्रत्येक शाळेत तर ते लावले जातातच. मात्र आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरस्वती देवीचे पह्टो हटविणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. शिवभोजन थोळी योजनेत मात्र ज्या तक्रारी आहेत त्यांची निश्चित चौकशी करून आढावा घेण्यात येईल. मात्र ती बंद करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.