वंदे भारतच्या वेळेत बदल, येताना 20 तर जाताना 10 मिनिटांची बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान सुरू केलेल्या सेमी हायस्पीड ‘वंदेभारत ट्रेन’च्या वेगावरून नाराजी व्यक्त होत असल्याची बातमी दै. सामनाने दिल्यानंतर या ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे . ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथून स. 6.10 वा.सुटेल आणि दु. 12.30 वा. च्या ऐवजी आता 12.25 वा. गांधीनगरला पोहोचणार आहे. म्हणजे  गांधीनगरहून  येताना 20 तर जाताना 10 मिनिटांची बचत होणार आहे.

ट्रेन क्र. 20901/20902 ही ट्रेन मुंबई सेंट्रल येथून स. 6.10 वा.सुटेल आणि दु.12.20 वा. गांधीनगरला पोहोचेल. गांधीनगर येथून दु.2.05 वा. सुटेल रा. 8.35 वा. ऐवजी 8.15 वा. मुंबई सेंट्रलला पोहोचेल. म्हणजे मुंबई ते गांधीनगर या गाडीला आता 6 तास 20 मि. ऐवजी 6 तास 10 मिनिटे लागणार आहेत, म्हणजे जाताना 10 मिनिटांची बचत होणार आहे तर परतीच्या प्रवासात गांधीनगर ते मुंबईसाठी ‘वंदे भारत’ला 6 तास 35 मि. ऐवजी 6 तास 20 मि. लागणार आहेत. म्हणजे येताना  गांधीनगर ते मुंबई प्रवासाची 20 मिनिटे वाचणार आहेत. गाडीच्या वेळेत बुधवारपासून हा बदल करण्यात आला आहे.