
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच डिजिटल रुपया अर्थात ई-रुपया लॉन्च केला जाणार आहे. हा पायलेट प्रोजेक्ट असणार असून हा डिजिटल रुपया काही विशिष्ठ बाबींसाठीच वापरला जाणार आहे.
सेंट्रल बँक डिजिटल करंन्सीने (सीबीडीसी) शुक्रवारी यासंदर्भात कन्सेप्ट नोट जारी केली आहे. डिजिटल रुपयाचे उद्देश, निवड, फायदे आणि धोके काय असू शकतात याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काही विशिष्ठ बाबींच्या वापरासाठीच ई-रुपये लॉन्च केला जाईल. या नव्या प्रणालीचा वापर आणि फायद्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. देशात डिजिटल चलनाचा वापर वाढवून व्यवहार अधिक पारदर्शक करण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान डिजिटल रुपया म्हणजे क्रिप्टो करन्सी नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीबीडीसी म्हणजे काय
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसी हे चलनाचे एक डिजिटल रूप आहे. आगामी काळात हा डिजिटल चलन सर्वांच्या वापरासाठी म्हणजे रिटेल आणि होलसेल म्हणजे ठराविक वित्तीय संस्थांपर्यंत विभागले जाऊ शकते.
अर्थसंकल्पात केली होती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली होती.


























































