
>> स्वरा सावंत
अध्ययन, अध्यापन प्रक्रिया कृतियुक्त, सुलभ, मनोरंजक व आनंददायी करण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयोग होत आहेत. यामध्ये ग्रामीण भागही मागे नाही. असाच प्रयोग संगमेश्वरातील वाडावेसराड गावातील जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी प्रथमच संगीतमय उच्चारांसह INTERACTIVE चौदाखडी निर्मिती केली आहे.
वाचन सुलभ होण्यासाठी चौदाखडी येणे आवश्यक आहे. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना पाठाचे व्हिडीओ पाठविण्यात येतात. पाठाचा व्हिडीओ सलग सुरू असतो, परंतु डिजिटल चौदाखडीमध्ये कृती केल्याशिवाय पुढे जात नाही. मोबाइल, संगणकाद्वारे चौदाखडीचा सराव करणे शक्य आहे. अभ्यासक्रम बदलला तरी याचा वापर कायम शक्य आहे. त्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.
नारायण शिंदे, मुख्याध्यापक, वाडावेसराड, संगमेश्वर
नारायण नानाराव शिंदे सध्या जिल्हा परिषद शाळा, वाडावेसराड, केंद्र कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथे आहेत. या शाळेत दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ते सतत तंत्रज्ञानाचा वापर करुन interactive ppt च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण कृतियुक्त आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे गुरुजींनी तयार केलेल्या डिजिटल चौदाखडीचे एकूण सात संच आहेत. हे सर्व एकत्र मिळावेत यासाठी smart pdf उपलब्धदेखील केले आहे. त्याचा वापर त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जिह्यात व राज्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
अंगणवाडीपासून मुलांना मुळाक्षरे ओळख शिकविली जाते. संगीत लहान मुलांनाही आवडते. त्यामुळे अध्यापनात संगीताचा वापर केला तर मुलांना चौदाखडी सहज पाठ होते. संगीतामुळे कधीही विसरता येणार नाही. याप्रमाणे चौदाखडी पक्की होते. निव्वळ याच उद्देशाने कोरोनातील सहा महिन्यांत गुरुजींनी संगीतमय उच्चारांसह घ्हीम्tग्न चौदाखडीची निर्मिती केली आहे. याबाबत सांगताना ते म्हणाले, ‘जय बैलगाडी घेऊन बाजारात गेला’ या वाक्यावर मुले दहा ते पंधरा प्रश्न तयार करतात. त्यांनी प्रश्न तयार करायला शिकले पाहिजे. प्रश्नमंजुषा आम्ही बनवतो. याआधीच्या शाळेत हा प्रयोग यशस्वी झाला होता. प्रश्न विद्यार्थीच बनवतात. त्यामुळे त्यातूनच त्यांची उत्तरे तयार होतात. हे प्रश्न विचारणे महत्त्वाचे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही पाठाबाहेरील गोष्टीतूनच करायचे. मुलांना व्यक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे शिंदे यांनी सांगितले,
भौगोलिक परिसरातून ज्ञानार्जन
विद्यार्थ्यांना बांधाचे चित्र दाखवले, तेव्हा विद्यार्थ्यांनी आमच्या गावात बांधच नाही, असे सांगितले. त्यामुळे मग त्यानंतर ग्रामपंचायतीत नेले. तेथे त्यांनी प्रश्न विचारले. त्याबाबतची शासकीय माहिती त्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना नकाशा बनवता येत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा गावातील पाण्याच्या टाकीवर उंचावर नेऊन येथून दिशा कोणत्या, शाळा कोठे, मंदिर कोठे, पाणी कसे जाते या मुद्दय़ांवर चर्चा झाल्यावर ते नकाशा करायला शिकले. यातून तर्कबुद्धी व भूगोलही शिकता येतो. शालेय व्यवस्थापन समितीत पालकांच्या मनोगतात पाणीविषयक प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडल्यावर त्याचे समाजात परिणामही जाणवतात, असे शिंदे यांनी सांगितले.
असा आहे डिजिटल संच
पहिल्या पानावर मुळाक्षरे आहेत. मुळाक्षरांवर क्लिक केल्यानंतर ‘क’ची चौदाखडी’ असे लेखन आहे. त्यावर क्लिक केले असता ‘क’ची चौदाखडी सुरू होते. खालील बाजूला स्वरचिन्हे दिलेली आहेत. त्यावर क्लिक केले असता उच्चारासहित interactive चौदाखडीचा सराव करणे सोपे होत आहे. चौदाखडीचे सात संच आहेत. प्रथम संचात ‘क’ ते ‘घ’, द्वितीयमध्ये ‘च’ ते ‘र’, तिसऱया संचात ‘ट’ ते ‘ण’, चौथ्या संचात ‘त’ ते ‘न’, पाचव्या संचात ‘प’ ते ‘म’, सहाव्या संचात
त सेन, तर सातव्या संचात ‘ज्ञ’पर्यंतची चौदाखडी आहे. सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे.
तंत्रज्ञानाची कास धरा!
प्राथमिक शिक्षकांनी शाळा बंद, पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मुलांपर्यंत शिक्षणाचा कसा केगकेगळ्या मार्गानी पोहचकला. ऑनलाईन-ऑफलाईन प्रकाराने शिक्षणाची गंगा किद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचकण्यासाठी शिक्षक अकिरत कष्ट करत आहेत. यामध्ये शहरी भागामध्ये मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सोईस्कर होते; पण ग्रामीण भागात जिथे नेटकर्कची सुकिधा उपलब्ध नाही, हाताकरचे पोट असणाऱया पालकांकडे स्मार्टफोन नाहीत, काडय़ा कस्ती दुर्गम भागात कसलेल्या दूरदूरच्या काडीमधील किद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे जोखमीचे आहे, अशा बिकट परिस्थितीतही संगमेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा काडाकेसराड या शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी किद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाचा झरा पोहोचकला. नेट उपलब्ध नसल्यामुळे interactive ppt क तंत्रज्ञानाचा कापर केल्याने किद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण अकिरतपणे सुरू आहे. अशाचप्रकारे रोजचा अभ्यास करत आहेत. परिस्थिती कितीही बिकट असली तरी इच्छा असेल तर तंत्रज्ञानाची कास धरली तर त्याकर मात करू शकतो.





























































