
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हा युवा अधिकारी – नितीन मडके (रिसोड, मालेगाव, वाशिम), झुबेर मोहनावाले (मंगरूळ, कारंजा, मनोरा), उपजिल्हा युवा अधिकारी – अश्वीन जगताप,गणेश बाळासाहेब देशमुख, शुभम मुसळे, जिल्हा चिटणीस – नाना देशमुख, निलेश टेकाडे, जिल्हा समन्वयक – सूरज भुसारी, शाम राठोड, श्रीकांत ठाकरे, विधानसभा युवा अधिकारी – गजानन टेंगडे (वाशिम- मंगरुळ), भगवान बोरकर (मालेगाव- रिसोड), शुभम वानखेडे (कारंजा- मनोरा), तालुका युवा अधिकारी – मनोज चौधरी (वाशिम तालुका), उपतालुका युवा अधिकारी – सचिन मस्के (वाशिम तालुका), तालुका युवा अधिकारी – अनिवाश पाटील दहातोंडे (कारंजा तालुका), गजानन सानप (रिसोड तालुका), उप तालुका युवा अधिकारी – परमेश्वर कांबळे (रिसोड तालुका), तालुका युवा अधिकारी – शिवा अंधारे (मनोर तालुका), शहर युवा अधिकारी – शाम पावडे (कारंजा शहर), उपशहर युवा अधिकारी – इद्रार गर्दियाकर (कारंजा शहर), शहर युवा अधिकारी – सुनील सुर्वे (मंगरुळ शहर), पैलास ठाकरे (रिसोड शहर), गणेश पुरी (मनोरा शहर), सोशल मीडिया समन्वयक – सुनील भीमाजीयानी, गजेंद्र गुंजाटे, कॉलेज कक्ष अधिकारी – शुभम राठोड.



























































