
वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने फटाके फोडण्याच्या वादातून चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
मोहम्मद समीम अन्सारी (38) हा वडाळ्याच्या शांतीनगर येथील मदिना मस्जिद परिसरात राहतो. सोमवारी दुपारी त्याच्या गाडी जवळ काही मुलं फटाके फोडत होती. त्या मुलांसोबत सादाबअली (24) हा तरुण देखील फटके फोडत होता. अन्सारी राहत असलेल्या गल्लीत मीटर केबलची लाईन गेलेली असल्याने तो सादाबअली याला त्याबाबत सांगायला गेला. फटाक्याची ठिणगी उडून आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अन्सारीचे म्हणणे होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि सादाबअलीने अन्सारीचा खांदा व दंडावर चाकूने वार केले.
























































