गडचिरोलीत भूकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गडचिरोली जिह्याच्या दक्षिण सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील काही भागांसह तेलंगणा राज्याच्या गोदावरी नदीच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास 3.8 रिस्टर स्केलचे सौम्य धक्के बसल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यातील उमानूर ते झिंगानुर हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. हे इंट्रापॅलेट या प्रकारातील भूकंपाचे धक्के असल्याचे अभ्याकांचे म्हणणे आहे.