पुष्पा 2 येतोय! अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील गाणी तसेच ‘पुष्पा झुकेगा नहीं’ हा डायलॉग खूपच गाजला. तेव्हापासून चाहते ‘पुष्पा’च्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत.

‘पुष्पा 2’चे शूटिंग सुरू झाले असून त्यातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. ‘पुष्पा 2’चे शूटिंग 30 ऑक्टोबरपासून सुरू झाले. सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी ‘पुष्पा- द रुल’ म्हणजेच ‘पुष्पा 2’च्या पहिल्या भागाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कुबा ब्रोझेक यांनी लिहिलंय की, ऍडव्हेंचर सुरू झाले आहे. पुष्पा – द रुल अल्लू अर्जुनचा नवा लुक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नव्या लुकचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. ‘पुष्पा – द राईज’ चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत 350 कोटींची कमाई केली.