थायरॉईड म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायरॉईड हा आजार स्त्रियांमध्ये खूप वाढताना दिसत आहे. थायरॉईड वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली. तुम्ही घरगुती उपाय करून देखील तुम्ही थायरॉईड नियंत्रणात आणू शकता.थायरॉईड हे गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते. यासोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही करते.

सर्दी झाल्यास कफ तयार होतो आणि कफ जास्त प्रमाणात जमा झाल्यास आतड्यांना आणि गळ्याला सूज येते. हळूहळू या सूज वाढत जाते. यालाच आपण गालगुंड झाले असे म्हणतो. आपल्या शरीरात काही अंत:स्राव करणाऱ्या ग्रंथी असतात. ज्याचे काम शरीरातील हार्मोन्सचं संतुलन ठेवण्यासाठी असते. या ग्रंथींपैकीच एक ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी असते. ही ग्रंथी गळ्याच्या मधल्या भागात असते. याला थायरॉईड असे म्हणतात.

थायरॉईडचा विकार प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो. थायरॉईड मध्ये दोन प्रकार असतात, हायपोथायरायडिजम आणि हायपरथायरायडिजम असे दोन प्रकार असतात. तसेच थायरॉईडमध्ये वजन कमी होते किंवा वजन वाढते देखील. थायरॉईड झाल्यास मानेचा खालच्या भागात सूज येते. आणि गाठ निर्माण होते. थायरॉईड हा आनुवंशिक आजार आहे. तसेच खाण्यापिण्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास, ताण तणाव , लठ्ठपणा,जागरण करणे यातून थायरॉईड उद्भवते.

लक्षणे –

१) सतत वजन वाढणे

2) सतत वजन कमी होणे 

३) घसा खवखवणे

४) हृदयाच्या गतीमध्ये बदल होणे

५) मूड बदलणे

६) केस गळणे

७) मासिक पाळी अनियमित होणे

८) उच्च रक्तदाब

९) झोप न येणे

१०) स्नायूंमध्ये दुखणे

११)चेहऱ्यावर सुज येणे

१२)कोरडी त्वचा

१३)थकवा

आहारातील मिठाचे प्रमाण संतुलित करणे, योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु करणे, ताण तणावांपासून स्वत;ला दूर ठेवणे, नियमित व्यायाम करणे हे यावरील उपाय आहेत.