एमपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा 29 ऑगस्टला घेण्यात आली होती. निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कटऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या पत्रकानुसार आता पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे.