
सीमावर्ती भागातील दुकाने चर्चेचा विषय ठरतात. असेच एक सीमाभागातील दुकान चर्चेत आले आहे. देशातील हे शेवटचे चहाचे दुकान आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, देशातील शेवटचे चहाचे दुकान मणिफद्रपुरी माणा नावाच्या गावाजवळ बद्रीनाथ येथे आहे. ते आता डिजिटल झाले आहे. या दुकानात यूपीआय बारकोड काऊंटरवर ठेवण्यात आलाय. म्हणजेच दहा हजार फूट उंचीवरही डिजिटल पेमेंट करता येणार आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चहा स्टॉलचा फोटो शेअर केला आहे. ‘एक फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा आहे,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.



























































