
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघातर्फे वाचक स्पर्धेचा कार्यक्रम जाहिर झाला असून उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे शनिवार 26 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वा. स्नेहसवर्धकः मंडळाच्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ‘मधु मंगेश कर्णिक याची कोणतीही साहित्यकृती’ या विषयावर स्पर्धकाने 10 मिनिटात त्याच्या कोणत्याही एका पुस्तकावर लिखित टिपणीचा आधार न घेता बोलायचे आहे. स्पर्धेतील तीन विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच सहभागींना प्रमाणपत्रे दिली जातील. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेसाठी सहभाग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. तरी इच्छूक स्पर्धकांनी दि. 22 नोव्हेंबर पर्यंत ग्रंथालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन ग्रंथालयाचे सचिव संजय धुरी यानी केले आहे.
























































