बालदिनी ‘सुमी’ प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या ‘सुमी’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही ‘सुमी’ याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बालदिनाच्या निमित्ताने ‘सुमी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची ‘सुमी’ची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिक्षण घेण्याचा तिचा अट्टाहास आणि त्यासाठी सुमी आणि तिच्या पालकांचा संघर्ष यात दिसतोय. ‘पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते’ असं म्हणणारी ‘सुमी’ची आई ही तेवढीच महत्वाकांक्षी व जिद्दी असल्याचे दिसून येतेय. ‘सुमी’ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून चित्रपटात दिवेश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन -रोहन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.