होळीच्या दिवशी झालेल्या वादाचा राग आता काढला, चुनाभट्टी येथे तरुणाच्या पोटात चाकू खुपसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीच्या दिवशी झालेल्या वादाचा राग मनात धरून देवमनी ऊर्फ शिंकू पांडे (25) याने धारदार चाकू एका तरुणाच्या पोटात खुपसल्याची घटना चुनाभट्टी येथे घडली. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात पांडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत मिसाळ (24) आणि देवमनी पांडे यांच्या होळीच्या दिवशी वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात ठेवून पांडेने रविवारी तो राग मिसाळवर काढला. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संकेत चेंबुरच्या सुमन नगर येथून एकटा जात असताना पांडे याने त्याला अडवले आणि सोबत आणलेले धारदार शस्त्र संकेतच्या पोटात खुपसले. यामुळे संकेतच्या पोटातल्या आतडय़ा बाहेर आल्याने तो गंभीर जमखी झाला.