
>> मृणाल घनकुटे
काळी वर्तुळे बहुतेक लोकांसाठी त्रासदायक असतात. हे सौंदर्य शत्रू केवळ चेहऱयाचे संपूर्ण सौंदर्यच काढून घेत नाहीत तर चेहऱयावरून आपण आजारी आहोत असेही दर्शवतात. झोप न लागणे, ताणतणाव, अनियमित आहार इत्यादींमुळे डोळय़ांखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ शकतात. ती लपवण्यासाठी कधी कधी कन्सिलरचाही वापर केला जातो, परंतु काळय़ा वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उपचार पद्धती आहेत. त्याबद्दल बोईसर येथील डॉ. त्वचा स्किन क्लिनिक येथील तज्ञ डॉ. हेमांगी राऊत यांनी माहिती दिली.
डोळय़ांखाली काळी वर्तुळे का असतात?
डॉ. हेमांगी राऊत म्हणाल्या, जेव्हा चेहऱयावरील नाजूक रक्तवाहिन्या आणखी नाजूक किंवा कमकुवत होतात आणि तुटतात तेव्हा काळी वर्तुळे निर्माण होऊ शकतात. खालच्या पापण्या आणि गाल यांच्यातील पोकळ भागाला अश्रुकुंड म्हणतात. काही लोकांमध्ये नैसर्गिक, मेकअप किंवा वृद्धत्वामुळे हे क्षेत्र गडद आणि अधिक दृश्यमान दिसून येते. हीच काळी वर्तुळे आहेत. काळी वर्तुळे निर्माण होण्याची इतर कारणेही असतात. जसे की एटोपिक त्वचारोग, निर्जलीकरण, झोप न लागणे किंवा अधिक काळ मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही इत्यादींचा उपयोग करणे.
कॉस्मेटिक प्रक्रियेचे फायदे
प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुग्णासाठी हे कमी खर्चिक आहे. याव्यतिरिक्त, किरकोळ सुरकुत्या आणि जरी डोळय़ांखालील काळी वर्तुळे सामान्यतः आरोग्यासाठी चिंतेची नसली तरी कॉस्मेटिक कारणांसाठीदेखील ती काढून टाकणे श्रेयस्कर आहे. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्यासाठी सर्वात योग्य काय आहे याबद्दल आपल्या त्वचा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
किती सत्रे आवश्यक
आवश्यक सत्रांची संख्या समस्येच्या तीव्रतेवर, निवडलेल्या उपचारांचा प्रकार यावर अवलंबून असते. तथापि, आम्ही दोन सत्रांमधील 4 दिवसांच्या अंतराने सरासरी 15 सत्रांची शिफारस करतो. प्रत्येक सत्र साधारणपणे 30 मिनिटे चालते. सत्रानंतर तुम्ही तुमच्या रुटीनवर परत जाऊ शकता असे डॉ. हेमांगी राऊत सांगतात.
कॉस्मेटिक उपचार कोणते…
अंडरआय फिलर्स
अंडरआय फिलरमध्ये हायलुरोनिक ऍसिड फिलर्स इंजेक्ट केले जाते, जे तुमच्या डोळय़ांच्या पापण्यांना व्हॉल्यूम प्रदान करतात आणि पोकळपणा भरताना काळी वर्तुळे दूर करतात. नंबिंग क्रीम लावल्यानंतर त्वचा विशेषज्ञ ही प्रक्रिया पार पाडतात. सुई किंवा कॅन्युला वापरून हे फिलर इंजेक्ट केले जातात. जरी ही फिलर्सची प्रकिया अगदी सुरक्षित असली तरी किरकोळ जखम होण्याची शक्यता असते जी काही दिवसांत बरी होते.
माइक्रोडोजिंग
हा एक नवीन कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे ज्यात शिफारस केलेल्या डोसपेक्षा कमी घटक त्वचेवर लावले जातात. उदाहरणार्थ जेव्हा बोटॉक्स वापरला जातो तेव्हा मायक्रोडोजिंगला अनेकदा ‘बेबी-बोटॉक्स’ असे संबोधले जाते. यात बोटॉक्सची किमान युनिट्स वरवर वापरतात.
अंशित सीओ 2 (फ्रॅक्शनेट सीओ 2)
ही सध्याची सर्वात ट्रेंडिंग ट्रीटमेंट आहे. या प्रक्रियेत अतिशय कमी pulesd light energy किंवा cotinuous light beams) वापरली जाते ज्यात कमीत कमी उष्णतेसह डोळय़ांखालची गडद वर्तुळे असलेला त्वचेचा थर पातळ करण्यात येतो.
केमिकल पील्स (एएचए)
केमिकल पील्स ही एक अशी उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये त्वचेचा पोत आणि टोन सुधारण्यासाठी केमिकल द्रावणाचा वापर केला जातो. काळय़ा वर्तुळांवर उपचार करण्यासाठी ग्लायकोलिक एसिड (एएचए) या केमिकल पील्स वापरली जातात.
मायक्रोकरंट फेशियल ट्रीटमेंट
मायक्रोकरंट ट्रीटमेंट केवळ काळी वर्तुळे दूर करण्यातच मदत करत नाही तर डोळय़ांभोवती फुगीरपणादेखील कमी करते. हे रक्त आणि पोषक द्रव्ये प्रभावित भागात पोहोचवते त्यामुळे चहऱयाची सतेजता सुधारते आणि डोळय़ांखालील भाग अधिक तरुण दिसतो.
सूचना – या सगळय़ा उपचार पद्धती अतिशय सुरक्षित, गुणकारी व माफक दरात आहेत. फक्त तज्ञ स्किन स्पेशालिस्ट किंवा डर्माटॉलॉजिस्टकडूनच करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

























































