
मुंबई शहर आणि उपनगरात राज्य सरकारने दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. पुढील वर्षी दहीहंडी 7 सप्टेंबर रोजी तर अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.



























































