भोरमध्ये विजेचा शॉक लागल्याने चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shock

गुंजवणी नदीपात्रातील कासुर्डी बंधाऱ्यामध्ये निगडे (ता. भोर) येथील एका शेतकऱ्यासह चार जण बंधाऱ्यात मोटर सोडत असताना विजेचा शॉक लागल्याने त्या चौघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.15) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. मृतांमध्ये बाप लेकाचा समावेश आहे.

गुंजवणी नदी पात्रातील पाण्याच्या बंधाऱ्यांमध्ये मोटर पाण्यात सोडण्यासाठी गेले असताना अचानक वीज सुरू झाल्याने पाण्यात वीज प्रवाह उतरला. त्यामुळे पाण्यात उतरलेल्या चौघांचाही मृत्यू झाला. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.