संग्राम-मृणालची साथ सोबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘साथ सोबत’ या मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुरेख कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स आणि मातब्बर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरणार असल्याचे टिझरवरूनच जाणवते. या चित्रपटात गावाकडची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. भपकेबाजपणापासून दूर असलेली साधी लव्हस्टोरी हेच या चित्रपटाचे खरे सौंदर्यस्थळ ठरणार आहे.

मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला संग्राम समेळ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. रमेश मोरे दिग्दर्शित ‘साथ सोबत’ चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मारू एंटरप्रायझेसची ही निर्मिती आहे.