
महसूल राज्यमंत्री म्हणून वाशिम जिह्यातील गायरान जमीन वाटप करण्याचा निर्णय हा आपण सदसद्विवेकबुद्धीला स्मरून घेतला होता. या प्रकरणात आपण कोणतेही नियमबाह्य काम केलेले नसून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालय जी शिक्षा देईल ती आपण भोगायला तयार आहोत, असे स्पष्टीकरण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले. मात्र मात्र सिल्लोड महोत्सवावर कोणताही खुलासा न करता त्यांनी मौन पाळले.



























































