65 मेगावॅटच्या सौर प्रकल्पातून वीज निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर  राज्यात 65 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यन्वित झाले आहेत. त्यामध्ये क्लिनटेक सोलर आणि एनटीपीसीने सदरचे प्रकल्प उभारले आहेत. येथे तयार होणाऱया विजेमुळे वितरण पंपन्यांना आपले अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. वीज पंपन्यांनी आपल्या एकूण वीज वितरणाच्या सुमारे 3 टक्के वीज अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पातून घेणे वीज आयोगाने बंधनकारक केले आहे. परंतु त्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने वीज वितरण पंपन्यांना कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीज खरेदी करावी लागत होती. मात्र आता क्लिनटेक सोलरने धुळे येथील ऊर्जा पार्कमध्ये 42 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यन्वित केला आहे. तर एनटीपीसाने सोलापूर येथे 23 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यन्वित केला आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होणार असल्याचे निश्चित झाले आहे.