बोरिवलीत रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  

बोरिवलीतील शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीने रविवार, 8 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सेंट रॉक्स शाळा, गोराई-2, बोरिवली पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केले आहे. 2023 हे वर्ष मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने मंडळाने विविध समाजपयोगी उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले आहे. मुंबईकरांनी शिबिराला भेट देऊन उत्स्फूर्त रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी नरेंद्र कदम – 9323955925, संजय चव्हाण -9869821501 यांच्याशी संपर्क साधावा.