आरॉन टेलर जॉन्सन जेम्स बॉण्ड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते डॅनियल क्रेग यांच्यानंतर पुढचा जेम्स बॉण्ड कोण साकारणार, याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. ‘बुलेट ट्रेन’, ‘एक्हेंजर्स – एज ऑफ अल्ट्रॉन’ फेम अभिनेता आरॉन टेलर जॉन्सन याची जेम्स बॉण्डच्या भूमिकेसाठी वर्णी लागल्याची चर्चा आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, 32 वर्षीय अभिनेता आरॉन टेलर जॉन्सन याने बॉण्डपटांच्या निर्मात्या बार्बरा ब्रोकोली यांची अलीकडेच भेट घेतली. एकढेच नक्हे तर गेल्यावर्षी त्याने जेम्स बॉण्डच्या भूमिकेसाठी गुपचूप ऑडिशनदेखील दिली होती. त्याची ऑडिशन निर्मात्यांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. गेली अनेक दशके चाहत्यांच्या मनाकर भुरळ घालणाऱया जेम्स बॉण्ड या ब्रिटिश गुप्तहेर व्यक्तिरेखेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. जेम्स बॉण्ड या चित्रपट मालिकेतील 25 चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. आतापर्यंत रॉजर मूर, शॉन कॉनरी, प्रियस ब्रॉसनन, टिमोथी डॉल्टन, जॉर्ड लेजेनबे आणि डॅनियल क्रेग यांनी जेम्स बॉण्डची भूमिका वठकली आहे. जेम्स बॉण्डला मानवी चेहरा देण्याचे काम डॅनियल क्रेग यांनी केले. त्यांनी आतापर्यंत पाच चित्रपटात बॉण्डची भूमिका साकारली असून ‘नो टाईम टू डाय’ हा त्यांचा शेकटचा बॉण्डपट होता.