
उठा बशा काढणे ही शिक्षा असेल तर तुम्ही जरा चुकताय.. कारण हा एक सुपर ब्रेन योग आहे. याला तमिळमध्ये थोपूकरनम पोझ म्हणतात. यामुळे एकाग्रता तर वाढतेच पण मेंदूची क्षमताही वाढते. यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो आणि मेंदु तल्लख होतो.
तीन टप्प्यांमध्ये उठा बशा काढा..
1) पाय पसरून उभे राहा. जीभ टाळूला लावा.
2) आता डाव्या हाताने उजव्या कानाचा खालचा भाग धरा. अंगठा समोर आणि पहिले बोट कानाच्या मागे ठेवा.
3) आता कान याच स्थितीत धरुन १० ते १२ वेळेस उठा बशा करा. बसताना नाकाने श्वास घ्या तर उठताना तोंडाने श्वास सोडा.






























































