आमचं कवच एकच… शिवसैनिकांसोबतचे फोटो शेअर करत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज कलानगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हजारो शिवसैनिक जमले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गाडीच्या टपावरून भाषण केलं. उद्धव ठाकरे भाषण करत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला होता.

निष्ठावंत शिवसैनिकांनी दर्शवलेल्या या प्रेमाचा फोटो शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहेत. य़ा फोटोंसोबत त्यांनी ”आमचं कवच एकच… तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद!” अशी पोस्ट शेअर केली आहे.