किरकोळ वादातून दोन गटांत तुफान राडा; साताऱ्यात 14 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहरानजीक प्रतापसिंहनगरात दोन गटांत किरकोळ कारणावरून राडा झाला. यामध्ये लाकडी दांडके, लोखंडी रॉड, धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल असून, पोलिसांनी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी शेखर संतोष बोकेफोडे (रा. प्रतापसिंहनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन विठ्ठल भालेराव, नितीन विठ्ठल भालेराव, लक्ष्मण विठ्ठल भालेराव, संजय विठ्ठल भालेराव, मयूर अरुण तुपारे, चैतन्य अरुण तुपारे, सविता अरुण तुपारे, प्रतीक्षा अरुण तुपारे, ओंकार भालेराव आणि बंडू भालेराव यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. काहीतरी कारणावरून चिडून धारदार शस्त्र्ा, लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे या तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱया बाजून सविता अरुण तुपारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेताजी तानाजी बोकेफोडे, माउली तानाजी बोकेफोडे, विनोद संतोष बोकेफोडे, प्रमोद संतोष बोकेफोडे (सर्व रा. प्रतापसिंहनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्यात बाटली फोडून जखमी करणे तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या राडय़ानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.