
घातक हत्यारे जवळ बाळगून हडपसर भागात दहशत माजविणार्या वाघमारे टोळीवर हडपसर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का कारवाई केली.
टोळीप्रमुख पंकज उर्फ पक्या गोरख वाघमारे (24, रा. हडपसर), स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर (22, रा. मांजरी), राहुलिंसग रिंवद्रसिंग भोंड (18, रा. हडपसर), आकाश उर्फ आक्या गोविंद शेंडगे (20, रा. मांजरी), अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपी वाघमारे यांनी संघटित टोळी करून हडपसर भागात दहशत माजविली होती. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तयार केला. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला. याला शर्मा यांनी मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 15वी कारवाई आहे.





























































