भायखळा कारागृहाबाहेर कॉन्स्टेबलची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा कारागृहाच्या मुख्य गेटजवळ एका कॉन्स्टेबलने सर्व्हिस एसएलआरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज रात्री घडली. श्याम वारघडे (48) असे त्या पोलिसाचे नाव होते. मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ते समजू शकले नाही.

‘ल’ विभाग-2 ताडदेव येथे कार्यरत असलेले वारघडे यांची भायखळा कारागृहाच्या मुख्य गेट येथे डय़ुटी होती. कामावर असताना आज सायंकाळी उशिरा त्यांनी सर्व्हिस एसएलआरमधून डोक्यात गोळी मारली. हा प्रकार कळताच नागपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या वारघडे यांना जे. जे. रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी वारघडे यांना तपासून मृत घोषित केले. वारघडे हे भायखळा पोलीस वसाहतीत राहत होते असे समजते. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.