
>> वैश्विक ([email protected])
आदिम काळात अवकाशाकडे विस्मयाने पाहणाऱ्या माणसाला रोजचा उगवता नि मावळता सूर्य आणि रात्री अंधार झाला की अवकाशात चमचमणारे हजारो तारे कुठून ‘प्रगट’ होतात याचं कुतूहल वाटायचं. काहीसं भीतीदायक कुतूहल. त्यातच बदलत्या ऋतुमानात हवेत घडणारे बदल, कोसळणारा पाऊस, कडाडणाऱ्या विजा आणि समुद्राच्या उसळत्या लाटांची कधी भरती तर कधी ओहोटी हे सारंच अनाकलनीय वाटायचं.
परंतु बुद्धीचं लेणं लाभलेल्या आपल्या प्रजातीने त्यावर त्या त्या काळानुसार विचार, चिंतन करायला सुरुवात केली. त्या काळातली अनेक आकलनं आणि त्यावर आधारित निष्कर्ष आज बरोबर ठरत नसले तरी कोणत्याही प्रयोगशील प्रक्रियेतल्या या पायऱ्या असतात. एका निष्कर्षावर अधिक विचार करताना त्यातील उणिवा लक्षात येतात. मग त्यात भर पडते ती पुन्हा त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेऊन केलेल्या नव्या विवेचनाची. त्यामुळे विश्वाच्या प्राचीन संकल्पनांविषयी जाणून घेताना आजची मापनपट्टी लावता येत नाही. कदाचित आजच्या आधुनिक वाटणाऱ्या काही संकल्पना उद्या कालबाहय़ ठरू शकतात याची शक्यता लक्षात घेऊनच संशोधन सुरू ठेवणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो.
त्यामुळे अगदी विज्ञान जगतातसुद्धा केल्विन यांनी म्हटले की, भौतिकशास्त्र्ाात आता आणखी जाणून घेण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, असं म्हणणाऱ्यांना थोडय़ाच काळात आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतांनी प्रचंड धक्का दिला. मात्र आपल्या कालच्या समजुती अयोग्य होत्या हे मुक्त मनाने स्वीकारून नव्या संशोधनाचं स्वागत करतो तोही वैज्ञानिक दृष्टिकोनच.
या लेखापासून आपण क्रमाक्रमाने, मोजक्या शब्दात विश्वरचना आणि त्यातील काही महत्त्वाच्या घटकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्या ‘खगोल’ कार्यक्रमात मधेच कुणीतरी विचारलं, ‘हे विश्व नेमपं कसं निर्माण झालं?’ ते आताच्या विज्ञानानुसार सांगितलं जाणारं ‘नेमपं’ कारण श्रोत्यांपुढे ठेवण्यापूर्वी त्यांना काही पारंपरिक विचारांची वैज्ञानिक पार्श्वभूमी सांगावी लागते. आमचे अभ्यासक सोप्या शब्दात ते सांगत असतात.
सुरुवातीला म्हटल्यानुसार नुसत्या डोळय़ांना क्षितिजापर्यंत दिसते तेवढी पृथ्वी म्हणजेच विश्व पिंवा रात्री वर आकाशात दिसणारे तारे हे ‘वेगळं’ विश्व अशा अनेक संकल्पना होत्या. मात्र क्षितिज शोधायचा प्रयत्न केला तरी सारखं ते दूरच पळतंय हेसुद्धा जाणवत होतं. त्यातून मग ‘सपाट पृथ्वी’ (फ्लॅट अर्थ) कल्पनेचा जन्म झाला. त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यापर्यंतच ‘पृथ्वी’ असेल तर जहाज कालांतराने दूरवरच्या प्रदेशात जाऊन येतात ती विविध ‘लोकां’ची एकावर एक अशीच रचना असावी असंही वाटलं. त्यावरून ही रचना करणारी एखादी शक्ती आहे पिंवा नाही यावरही अगदी आपल्याकडे ऋग्वेदातल्या ‘नारदीय सूक्ता’त चर्चा झाली. हा विचारांच्या आदान-प्रदानाचा मुक्तपणाच नव्या संशोधनाला वाव देतो. त्यातून आपल्याकडे आपापल्या पद्धतीने विश्वरचनेची मांडणी करणारे ऋषी आणि ‘ज्यातिःशास्त्र्ााr’ निर्माण झाले. ‘ज्योतिः’ म्हणजे अवकाशात चमकत्या ‘वस्तू’ आणि त्यांचं शास्त्र्ा (पिंवा विज्ञान) म्हणजे ज्योतिःशास्त्र्ा, एवढाच मूळ अर्थ. फलज्योतिष हा प्रकार नंतरचा. पण त्या काळात खगोलशास्त्र्ा आणि फलज्योतिषी जगात बऱ्याच ठिकाणी होते असे आढळेल.
कालांतराने केवळ खगोलीय गणितं करून भौतिक विषयांचे मूलभूत सिद्धांत शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याला गणिताची जोड अत्यावश्यक असल्याने ही मंडळी उत्तम गणितीही असायची. आपल्याकडे आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य (पहिले व दुसरे) असे अनेक खगोल अभ्यासक होऊन गेले. गणितात दशमान पद्धत आणि ‘शून्या’चं चिन्ह आपण जगाला दिलं आणि अभ्यास सोपा झाला.
याच प्राचीन काळात ग्रीस, इजिप्त, इटली, चीन या ठिकाणीही अनेक संशोधक कार्यरत होतेच. आताच्या विश्वाच्या प्रारूपांपैकी (मॉडेल्स) आता कालबाहय़ ठरूनही अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची प्रारूप टॉलेमी आणि कोपर्निकस यांची टॉलेमी सन 100 ते 170 असा आधुनिक कालगणनेच्या पहिल्या शतकातला तर कोपर्निकस 1473 ते 1543 म्हणजे पंधरा-सोळाव्या शतकातला.
टॉलेमीच्या आकलनानुसार त्याने पृथ्वीवरून सूर्यासह संपूर्ण आकाशाचे (अवकाशस्थ ताऱ्यांचे) जे भासमान भ्रमण दिसते तेच सत्य मानून आपले ‘विश्व’ भूपेंद्रित (जिओसेन्ट्रिक) आहे असा विचार मांडला. म्हणजे विश्वाच्या पेंद्रस्थानी पृथ्वी असल्याचं टॉलेमीला वाटलं, कारण निरीक्षणात तसंच दिसत होतं. पृथ्वीच्याच गतीमुळे हा भास होतो हे पाश्चात्यांना कळायला आणखी बराच अवकाश होता.
दरम्यान, आपल्या महाराष्ट्रातील खगोलतज्ञ (दुसरे) भास्कराचार्यांपासून (बारावे शतक) पृथ्वी सूर्याभोवती फिरते, अवकाशात भ्रमण करते हे समजलं होतं. निकोलस कोपर्निकसने विश्वाचं पेंद्र म्हणजे सूर्य असं पंधराव्या शतकात म्हटलं. पृथ्वीसह सर्व ग्रह त्याभोवती फिरतात या त्याच्या कल्पनेने ‘पृथ्वीकेंद्रित विश्वा’ची संकल्पना रद्द झाली, परंतु तीही परिपूर्ण नव्हतीच. अखेरीस आपली सूर्यमाला, दीर्घिका वगैरेंसह प्रचंड विश्वाची उत्पत्ती कशी आणि कधी झाली यावर विसाव्या शतकात जास्त ऊहापोह झाला. त्यातून विश्व स्थिर स्थितीत आहे असा एक मतप्रवाह तर दुसरा ‘बिग-बँग’ या क्षणापासून विश्वाची निर्मिती झाली असं म्हटलं गेलं. अखेरीस विश्वाच्या प्रसरणशीलतेच्या निरीक्षणांनी ‘बिग बँग’चे महत्त्व वाढले. त्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात.

























































