‘कस’ काय ‘बा’? कोण बाजी मारणार! चिंचवडच्या पोटनिवडणुकीचाही आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उद्या (दि. 2) होणाऱ्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कसब्यामध्ये कोण बाजी मारणार यासाठी पैजा लागल्या असून, सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे कसब्यात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यात नवे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत होत आहे. कसबा पेठ निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठsची करीत या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या पेंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पॅबिनेट मंत्री, आमदार, माजी नगरसेवकांचा फौजफाटा प्रचारात आणला होता. मात्र, दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यापुढे भाजपला आवश्यक ते वातावरण निर्माण करता आले नाही. निवडणुकीत मतदारांच्या ओठी केवळ धंगेकर यांचेच नाव होते. त्यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.