
हिंदुस्थानी नौसेनेकडून अरबी समुद्रात ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण केलं आहे. या परीक्षणादरम्यान ब्रह्मोसने आपल्या लक्ष्याचा अचूक भेद केला. नौदलाच्या कोलकाता येथील लढाऊ जहाजावरून या क्षेपणास्त्राचं परीक्षण करण्यात आलं.
डीआरडीओने बनवलेल्या बूस्टरसह हे क्षेपणास्त्र सज्ज आहे. बूस्टर लावल्यानंतर त्याचं परीक्षण घेण्यात आलं आणि ते यशस्वी देखील झालं. आता या क्षेपणास्त्रात स्वदेशी सामुग्रीचं प्रमाण वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
























































