
बांगलादेशची राजधानी ढाका येथे मंगळवारी एक शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात 14 जण ठार झाले असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावर हा स्फोट झाला. अद्याप या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या स्फोटामुळे इमारतीतील दुकानांचे नुकसान तर झालेच आहे सोबतच रस्त्याचे देखील नुकसान झाले आहे. या स्फोटातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
चितगाव येथे शनिवारी देखील एका ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. फेब्रुवारी महिन्या देखील ढाका येथील एका निवासी इमारतीला आग लागली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहे.






























































