
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रोळी विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील.
विभाग युवती अधिकारी – अल्पिता वारंग-गावडे, उपविभाग युवती अधिकारी – अपूर्वा महाला (शाखा 111, 117), मंजिरी मोहिते (शाखा 118, 119), श्वेता वायकर (शाखा 120, 122), विधानसभा समन्वयक – पल्लवी नकाशे (शाखा 111, 117), रेणुका बोऱहाडे (शाखा 118, 119), सुषमा दहिवलकर (शाखा 120, 122), विधानसभा चिटणीस – यज्ञा परब (शाखा 111, 117), माधुरी दोडके (शाखा 118, 119), प्राजक्ता रेडकर (शाखा 120, 122), शाखा युवा अधिकारी – कोमल सावंत (शाखा 111), वांशीता राऊळ (शाखा 117), आदिती चव्हाण (शाखा 118), श्रुती पोलेकर (शाखा 119), समृद्धी पाटील (शाखा 120), काजोल राठोड (शाखा 122), शाखा समन्वयक – ज्योती धमानिया (शाखा 111), श्रावणी कदम (शाखा 117), आदिती ढगे (शाखा 118), जान्हवी परब (शाखा 119), प्रतीक्षा पाटील (शाखा 120), ज्योती घाडगे (शाखा 122) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
























































