
लातूर जिल्ह्यातील रिंग रोड जवळ पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल चालवणार्या चालकास रस्त्यावर थांबून मोबाईलवर बोलत असताना चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी चार जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सलीम हुजूर शेख हॉटेल चालक यांनी विवेकानंद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे की, दिनांक 12 मार्च रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल जगदंब समोर फोनवर बोलत असताना लक्ष्मण गायकवाड उर्फ लकी (रा. बालाजी नगर लातूर) व त्याच्यासोबत इतर तिघे अनोळखी त्यामध्ये दोन शिकलकरी होते.
फिर्यादीच्या जवळ येऊन त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. शिकलकरी असलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या छातीत त्याच्या हातातील कड्याने मारून जखमी केले. तसेच एकाने दगडाने डोके फोडले, चेहर्यावर व डाव्या हाताच्या खुब्ब्यावर मारून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
























































