
हापूसचा हंगाम यंदा समाधानकारक सुरू झाला असला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फुटलेल्या मोहराला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात मार्केटमध्ये आंब्याची आवक घटणार असल्याने आंब्याचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सध्या दररोजची आंब्याची आवक सुमारे 62 हजार पेट्यांपर्यंत गेली आहे. ही आवक गेल्या वर्षाच्या तुलनेत तिप्पट असल्याने आंब्याच्या पेटीचा दर दीड हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आला आहे.
कोकणात यंदा आंब्यासाठी चांगले वातावरण असल्याने ऑक्टोबर महिन्यात मोहराची चांगली फूट झाली. परिणामी फेब्रुवारीमध्ये आंब्याचा हंगाम बऱ्यापैकी सुरू झाला. मात्र याच महिन्यात कोकणामध्ये तापमानात वाढ झाली. आंब्यासाठी 32 ते 34 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे फेब्रुवारीत कोकणच्या अनेक भागात पारा थेट 39 अंश सेल्सिअसपर्यंत वर चढला. त्यामुळे सुपारीएवढ्या आकाराच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. अनेक बागांमध्ये फळे काळी पडली. या संकटातून आंब्याच्या बागा सावरत नाही तोच मार्च महिन्यात कोकणात अवकाळी पाऊस पडला. या पावसाचा मोठा फटका नोव्हेंबरनंतर निर्माण झाली आहे.
बाजारावर मंदीचे सावट
एपीएमसी मार्केटमध्ये यंदा मार्च महिन्यात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे पेटीचे दर थेट दीड ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आले आहेत. आवक वाढल्यामुळे आंबा लवकरच सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. मात्र यंदा मंदीचे सावट असल्याने मालाला पाहिजे त्या प्रमाणात उठाव नाही. गेल्या वर्षी मार्केटमध्ये आंब्याची जास्तीत जास्त आवक थेट 90 हजार पेट्यापर्यंत गेली होती. मात्र यंदा इतकी मोठी आवक होण्याची शक्यता कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
बागायतदारांना नुकसानभरपाई द्या
फुटलेल्या मोहराला झाला आहे. पावसामुळे झाडांना नव्याने पालवी फुटल्याने त्याचा विपरित परिणाम फळांच्या आकारांवर होणार आहे. अवकाळी पावसामुळे दुसऱ्या मोहराचे मोठे नुकसान झाल्याने एप्रिलमध्ये बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटून दरामध्ये तेजी येण्याची शक्यता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका कोकणातील आंब्याच्या बागांना बसला आहे. यंदा सर्व काही सुरळीत सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात तापमानात अचानक वाढ झाली. आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्य सरकारने कोकणातील आंबा उत्पादक बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मी करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.



























































