रंगभूमी – नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या रंगांची उधळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजय कुळकर्णी

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आणि रंगकर्मींत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. निवडणुकीनंतर जे उमेदवार निवडून येतील त्यातून नियामक मंडळ बनेल. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कार्यकारण बनेल. दोन-तीन वर्षे नाटय़ परिषद शांत झाली आहे. कुठलेही उपक्रम करू शकलेली नाही. तिला चालना मिळेल असं त्यांना वाटतंय. यात चुकीचं काहीच नाही. कारण नाटय़ परिषदेला अध्यक्ष असूनही नसल्यासारखा होता. नियामक मंडळातील सभासदांचा प्रसाद कांबळी या अध्यक्षाच्या कामास विरोध होता. त्यामुळे नियामक मंडळाच्या संमतीशिवाय अध्यक्षाला आणि नाटय़ परिषदेला कुठलाही निर्णय घेता येत नव्हता. त्यामुळेच 100 व्या नाटय़ संमेलनाचं आयोजन करता आलं नाही.

100 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. जब्बार पटेल यांच निवड होऊनही तसंच 100 व्या नाटय़ संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण शरद पवार आणि सई परांजपे यांच्या हस्ते झालेलं असूनही संमेलन कधी होणार याच चिंतेत रंगकर्मी होते. नाटय़ परिषदेच्या हक्काचं यशवंत नाटय़गृह लॉकडाऊनच्या काळात आणि लॉकडाऊन उठल्यावरही बंद होतं. कारण काय? फायर एनओसी नसल्यामुळे ते बंद ठेवणं भाग होतं असं कारण पुढं केलं गेलं. अशा अनेक गोष्टींचे रवंथ करण्यात दीड वर्षाहून अधिक काळ गेला. आता नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे रंगकर्मी मतं मागण्याच्या कामाला लागलेले दिसताहेत. व्यावसायिक रंगभूमवरचे रथीमहारथी निवडणुकीच्या रिंगणात दिसताहेत. महाराष्ट्रात आता पुन्हा रंगांच उधळण होणार आहे. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच ही रंगपंचमी असणार आहे. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी हे दोन गट एकमेकांविरुद्ध ‘आम्हालाच मतं द्या’ अश मागणी करणार आहेत. प्रसाद कांबळी यांनी नियामक मंडळ सभासदांच्या विरोधात आपल्या अध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण केली. त्यांच्या विरोधात प्रशांत दामले पॅनल उभे आहे. त्याला बहुतांश सभासदांची सहानुभूती आहे.

त्यांच्या पॅनेलचं नाव आहे ‘रंगकर्मी नाटक समूह.’ ‘साद प्रेमाची, आस परिवर्तनाची’ हे त्यांचं घोषवाक्य आहे. त्यांना नाटय़ परिषदेचा चेहरा मोहरा बदलायचाय. हौश, व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर यासारख्या रंगकर्मींबरोबरच ज्येष्ठ, कनिष्ठ रंगकर्मींना भेडसावणाऱया समस्यांबद्दल उपाययोजना तसंच रसिक आणि रंगकर्मी यांच्यातील हरवत चाललेलं नातं अधिक दृढ करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने त्यांचं पॅनल निवडणुकीला उभं आहे. या पॅनलमध्ये प्रत्यक्ष कृत करणारी मंडळी असून त्यांन वेळोवेळी आपल्या कामातून ते सिद्ध केलं आहे. नाटय़ परिषदेच्या माध्यमातून अनेक नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी तसंच नाटय़गृहाच्या अवस्थेबद्दल ठोस उपाययोजना करण्यासाठी ‘रंगकर्मी नाटक समूह’ कटिबद्ध आहे, असं ते जाहीरपणे बोलताना दिसत आहेत.

प्रसाद कांबळी यांचं ‘आपलं पॅनल’ असून त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जसं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत, ज्याची सत्ता असेल ते हे काम आम्ही केलंय असं निवडणुकीत आणि जाहीरनाम्यातून म्हणतात तसंच थोडय़ाफार प्रमाणात ‘आपलं पॅनल’ यांच्या जाहीरनाम्यात प्रकर्षानं दिसत आहे. मुंबई आणि ठाणे नाटय़गृहाच भाडी त्यांच्यामुळे कमी झाल, नाटकांच्या बसेससाठी टोल माफीसुद्धा त्यांन केल असं त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तसंच त्यांन घेतलेल्या 98 व्या 60 तासांच्या विक्रम नाटय़ संमेलनाचा प्रामुख्याने त्यांन जाहीरनाम्यात उल्लेख केलेला आहे. कोरोना काळात त्यांन 882 रंगकर्मींना केलेल्या मदतचाही विशेष उल्लेख आहे. खरं म्हणजे ज्यावरून वादाच ठिणग पडल ते हेच प्रकरण. पुढच्या काळातल त्यांन मांडलेल उद्दिष्टं आणि करणाऱया कामाबद्दल त्यांन जाहीरनाम्यात अधोरेखित केलेलं आहे.

कामं तीच आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, त्यांना नाटय़गृह नव्याने बांधायचंय. तन अत्यानुधिक आणि अद्ययावत नाटय़गृहांच उभारणी करावयाची आहे. यशवंत नाटय़गृह उभारण्यासाठी नाटय़ परिषदेने निधी कसा गोळा केला हे प्रत्येक सभासद आणि रसिक प्रेक्षक जाणतो. आता नव्याने उभारण्यासाठी पुन्हा शासनाकडे हात पसरणार हे ओघाने आलंच. वास्तू विशारद शश प्रभू यांचा नव्याने उभारणस विरोध होता. आता त्यांन संमत कशी दिल? याचं कुतूहल सर्वच रंगकर्मींना आहे. हौशसाठी ते बुधवार योजना राबविणार आहेत. ही योजना त्यांन त्यांच्या कारकिर्दीत का सुरू केल नाही हा सवाल हौशी रंगकर्मींन केला आहे. अनेक उपक्रमांचा संकल्प या जाहीरनाम्यात आहे. यावरून एकच लक्षात येतंय की, यंदाच अखिल भारतय मराठी नाटय़ परिषदेच पंचवार्षिक निवडणूक चुरशीच होणार यात शंकाच नाही. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नाटय़ संकुल नव्याने उभारणार आहेत म्हणून तर नाही ना या निवडणुकीत रथी-महारथी उभे राहिलेत? अश चर्चा सुरू झालेली आहे. निवडून आल्यावर नाटय़ परिषदेच सूत्रे कुणाच्या हातात पडणार का पुन्हा वादविवाद होणार हे कळेलच. महाराष्ट्रातून निवडून येणाऱया नियामक मंडळ सदस्यांच संख्या अधिक असल्यामुळे अध्यक्ष निवडीच्या चाव्या त्यांच्यात हातात असतील. निवडणूक 16 एप्रिल रोज आहे. जसजसे दिवस जवळ येतल तसतसा या निवडणुकीचा रंग बहरेल. नाटय़ परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाच चाहूल प्रकर्षाने दिसतेय. तेव्हा आता तरी एकच म्हणायचं- ‘जय नाटय़ परिषद’!
– [email protected]