टीआयएमईकडून कॅट टॅलेंट सर्च एक्झामिनेशनची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआयएमई कॅट संस्थेने शिष्यवृत्ती चाचणी जाहीर केली आहे कॅट 2023-2024 च्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा शोध परीक्षा (टीटीएसई) सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 काजता या दोन स्लॉटमध्ये ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. विद्यार्थी रविकार, 9 एप्रिलला ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात. टीआयएमई टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (टीटीएसई) मध्ये परिमाणकाचक, तार्किक आणि शाब्दिक क्षमता या विषयाकर बहुपर्यायी प्रश्न असतील. टॅलेंट सर्च परीक्षाचा कालावधी (टीटीएसई) 1 तास असेल. जे विद्यार्थी 2 एप्रिल ते 9 एप्रिलदरम्यान नोंदणी करतील त्यांना कॅट 2023-2024 कोर्स फी वर 5 हजारांची सवलत मिळणार आहे.

‘डेटा फॉर डेव्हलपमेंट’वर चर्चा
कुमारकोम Š जी 20च्या देशाच्या अध्यक्षतेखाली विकास कार्यगटची दुसरी बैठक केरळमधील कोट्टायम जिह्यातील कुमारकोम येथे झाली. यावेळी अनेक तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक, विचारवंत आणि नागरी समाजातील वक्ते यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीत डेटा फॉर डेव्हलपमेंट, लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट आणि फक्त ग्रीन चेंज या विषयावर एक साइड इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. ही बैठक 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या आधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकास कार्यगटाची पहिली बैठक मुंबईत झाली होती.