
आपल्या न्याहारीला अंडी ही लागतातच. परंतु अंडी ताजी असणं फार महत्त्वाचे आहे कारण जर का शिळी अंडी असतील तर त्याचा आरोग्यावर परिणाम शकतो. तेव्हा जाणून घेऊया की ताजी अंडी कशी ओळखावीत? अंड्याचे अनेक फायदेही आपल्या शरीरासाठी आहेत. विकत आणलेली अंडी ही फ्रेश ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा उपयोग करून घेतो. त्यामुळे फ्रिजमध्येही हे अंडे किती ताजे राहतील याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपल्या अंड्यातून चांगली पोषक तत्त्वे मिळतात. अंड्यांमध्ये प्रोटीन असते आणि आपल्याला ताकदही मिळते. तेव्हा आपल्याला जर का हे सर्व गुणधर्म हवे असतील तर आपल्याला ताजी अंडी खाणं आवश्यक आहे. अंड्यावरची आपल्याला एक्सपायरी डेट प्रत्येक वेळाला कळतेच असे नाही. त्यामुळे अंडी साधारण किती वेळ टिकतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.
शिळी अंडी खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो?
अंडी जर का जास्त तापमानात ठेवली तर ती नंतर चांगली राहत नाहीत. त्याच्या जंतु संसर्ग होऊ लागतो. जर का तुम्ही शिळी अंडी खाल्लीत तर त्यानं तुम्हाला उलट्या, पोटदुखी, जुलाब असे आजार उद्भवतात.
शिळी अंडी कशी ओळखावीत?
तुम्हाला जर का अशा संशय येत असेल की तुम्ही घरच्या घरी शिळी अंडी ओळखू शकतात. गरम पाण्याचा ग्लास घ्या. जर का अंड हे पाण्याच्या वरच्या बाजूला तरंगतच राहिले तर समजा की अंड खराब झालेले आहे. जर का ते सरळ ग्लासच्या खालच्या बाजूला गेले आणि आडवे झाले की समजा अंड हे ताजं आहे. जर ग्लासच्या खालच्या भागाला जाऊन अंड तंरगत राहिले की समजा अंडे शिळे आहे.
किती वेळ टिकतात अंडी?
अंडी ही फ्रिजमध्ये 3-4 आठवडे म्हणजेच 10-12 दिवस तरी टिकतात.




























































