अंत्यसंस्काराच्या तीन दिवसानंतर ‘तो’ जीवंत परतला, गावात उडाली खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मृतदेहावर अत्यंसंस्कार केल्यानंतर तीन दिवसांनी ती व्यक्ती जीवंत परतली आणि गावात एकच खळबळ उडाली.

बिहारच्या पाटना येथील देवन राय नावाची एक व्यक्ती गेल्या आठवड्यात बेपत्ता झाली होती. बराच शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली. दोन दिवसानंतर गंगा किनारी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला असता तो देवन राय याचा असल्याचे सांगितले होते.

देवन राय यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आला. कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र तीन दिवसांनी देवन राय परत आले. त्यांना पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यावेळी त्याने घडलेला प्रसंग सांगितला, यामध्ये त्याला नोकरीचे आमिष दाखवून दूर नेले होते तिथून तो पळून आले होते.

याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. परंतु त्याने उलट राय कुटुंबावर आरोप केला आहे की, देवन राय यांच्या कुटुंबानेच मला या प्रकरणात अडकवण्यासाठी हा कट रचल्याचे सांगितले.