
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, असे बेताल वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्वत्र संतापाची लाट आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी मुंबईसह राज्यभरात चंद्रकांत पाटलांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. संतप्त शिवसैनिकांनी ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’ असे नारे देत निषेध नोंदविला.
नागपूर येथील कळमना चिखली चौक येथे संतप्त शिवसैनिकांनी गाढवाच्या मुखाला चंद्रकांत पाटील यांचा मुखवटा लावून आपला राग व्यक्त केला. संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला जिल्हा युवाधिकारी प्रीतम कापसे, नाना झोडे, सुरेखा खोब्रागडे, मंगला गवरे, नीलिमा शास्त्राr, अंजू गुप्ता, आशा इंगळे, रंजना राजबांडे, विभागप्रमुख अंगद हिरोंदे, हरीश रामटेके, अंकुश भोवते, शिवशंकर मिश्रा, विशाल कोरके, चेतन कश्यप, विजय शाहू, मुकेश रेवतकर, सुरेंद्र अंबिलकर, भास्कर कायरकर, मनीष हरने, आशीष गाडीकर, गौरव महाजन, भूपेंद्र कटाने, गौरव मोहोड, साबिर खान आदी उपस्थित होते. कोल्हापुरातही तीक्र निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवसेना विभाग क्र. 9 तर्फे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या गुरुवारी मानखुर्द स्टेशन शाखा क्र. 143 येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.



























































