
एकीकडे सर्वत्र अवकाळी पावसाचे सावट असताना ठाणे शहरात मात्र पारा चांगलाच भडकला आहे. आज दिवसभरात रेकॉर्डब्रेक 43.1 एवढय़ा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हाळा असह्य होत चालल्याने दुपारी 12 नंतर घराबाहेर पडण्यास ठाणेकर घाबरत आहेत.
ठाण्याचे जणू ‘नागपूर’ झाले असून घरातील एसी, कुलर, फॅन दिवसाही सुरू ठेवावे लागत आहेत. ठाणे महानगरपालिकेने तर दुपारी 1 ते 3 यादरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.



























































