
मुंबईतील आरे कारशेड परिसरातील 177 झाडं तोडण्यास सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एमएमआरसीएकडून वृक्षतोड करण्यात येत आहे. 177 पैकी 53 झाडांचं प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तर 124 झाडं कापण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरे कारशेड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरे कॉलनीतील मेट्रो-3 च्या कारशेड बांधकामासाठी ही वृक्षतोड करण्यात येत आहे.





























































