इतर गोलंदाज मार खात असताना अर्जुन तेंडुलकरची सुरेख गोलंदाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादेत मंगळवारी गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडीयन्स असा सामना रंगला. या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला पुन्हा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मंगळवारच्या सामन्यापूर्वी मुंबईत रंगलेल्या पंजाब सुपरकिंग्जविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाच्या पराभवाचं खापर अर्जुन तेंडुलकरवरही फोडण्यात आलं होतं. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सगळ्यात महागडे षटक टाकले होते. एका ओव्हरमध्ये त्याने 31 धावा दिल्या होत्या. आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम डॅनिअल सॅम्सच्या नावावर असून त्याने एका ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या होत्या.

पंजाबविरूद्धच्या सामन्यात महागडा गोलंदाज ठरलेला अर्जुन तेंडुलकर गुजरातविरूद्धच्या सामन्यात कसा खेळतो याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या सामन्यात गुजरातच्या संघाने मुंबई इंडियन्सची गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. एकीकडे मुंबईचे अनुभवी गोलंदाज मार खात असताना अर्जुन तेंडुलकरने मात्र चांगली गोलंदाजी केली. त्याच्या वाटेला 2 षटके आली मात्र त्याने यात फक्त 9 धावा देत एक विकेट घेतली. मुंबईच्या सगळ्या गोलंदाजांमध्ये तो सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. रायली मेरेडीथ आणि कॅमेरून ग्रीन या अनुभवी गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांनी अनुक्रमे 12.25 आणि 19.50 च्या सरासरीने फोडून काढला. ग्रीनला तर एकही बळी टीपता आला नाही. मुंबईतर्फे सर्वाधिक बळी पियुष चावलाने टीपले. त्याने गुजरातच्या 2 फलंदाजांचा अडसर दूर केला होता.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स- 20 षटकांत 6 बाद 206 (शुभमन गिल 56, डेव्हिड मिलर 46, अभिनव मनोहर 42, राहुल तेवतिया ना. 20; पीयूष चावला 4-0-34-2, अर्जुन तेंडुलकर 2-0-9-1).

मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 9 बाद 152 (कॅमेरून ग्रीन 33, सूर्यकुमार यादव 23, नेहाल वढेरा 40 ; नूर अहमद 4-0-37-3, राशीद खान 4-0-27-2, मोहित शर्मा 4-0-38-2).