
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी संशयित आरोपी आयुष कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गौतमी पाटील हीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. राज्य महिला आयोगानेदेखील याप्रकर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.






























































