रहस्यमय तरंगांनी डेन्मार्क हादरलं, भूवैज्ञानिक बुचकळ्यात पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेन्मार्कमधील बोर्नहोम द्वीपावर रहस्यमय भूतरंगांची नोंद झाली असून त्या तरंगांमुळे शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत. एका अज्ञात स्रोताकडून हे भूतरंग उमटत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एखाद्या वस्तू किंवा स्रोताच्या कंपनामुळे उमटणाऱ्या कंपनांना ध्वनिदबाव तरंग म्हटलं जातं. शनिवारी सर्वप्रथम हे तरंग नोंदवण्यात आले.

हे स्फोट पोलंडच्या 140 किमी दक्षिणेला केलेल्या स्फोटामुळे हे तरंग उमटत असावेत असा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तवला होता. त्यानंतर शनिवारी बोर्नहोम येथे 60हून अधिक लोकांना ध्वनिदबाव तरंग जाणवले. पण हे तरंग नेमके कसे निर्माण झाले याचा ठोस निष्कर्ष भूवैज्ञानिकांना काढता आलेला नाही.

त्यात जमीन थरथरणे, गडगडाट आणि कानांमध्ये जाणवणारा दबाव यांचा समावेश होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे तरंग जवळपास भूकंपासारखे होते. पण सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. हे हादरे 2.3 रिक्टर स्केल इतके होते. बोर्नहोम हे बेट बाल्टिक समुद्रातील एक बेट आहे. या भागात जवळपास 40 हजार नागरिक राहतात.