तांदूळ साठवण्याचा उत्तम मार्ग..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

तांदळाची योग्य पद्धतीने साठवणूक केली नाही तर तांदळाला कीड लागण्याची समस्या उद्भवू शकते. त्याची योग्य पद्धतीने साठवणूक होणे फार गरजेचे असते.

तमालपत्र-
हा मसाल्यातील एक प्रकार आहे. हा स्वयंपाक घरात सर्रास वापरला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी या पानांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे ही पाने जेवणाची चव वाढवण्यास फायदेशीर ठरतात त्याप्रमाणे कीडे दूर ठेवण्यासाठी देखील त्याचा सर्रास वापर केला जातो. पण, ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही याचा तांदूळ साठवण्याकरता वापर करु शकता. तांदळाच्या डब्यात तमालपत्र ठेवल्याने किड लागत नाही. यामुळे तांदूळ सुरक्षित राहतो आणि दीर्घकाळ टिकतो.

कडुलिंबाची पाने-
कडुलिंबाच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक किटक दूर राहण्यासाठी याचा वापर केला जातो. तांदळाच्या डब्यात तुम्ही कडुलिंबाची पाने ठेऊ शकता.

लाल मिरची-
आपले जेवण चमचमीत करण्यासाठी आपण मिरचीचा वापर करतो. याच मिरचीचा तुम्ही तांदळाच्या साठवणूकीकरता वापर करु शकता. तांदळाच्या डब्यात मिरच्या ठेवल्याने तांदळाला कीड लागत नाही आणि तांदूळ बरेच दिवस टिकून राहतो. यामुळे तांदळाला किड लागत नाही.

लसूण-
लसूण देखील मसाल्यातील एक पदार्थ आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा सर्रास वापर केला जातो. किवा न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. यामुळे तांदळाला कीड लागत नाही. तसेच लसूण सुकल्यानंतर त्याच्या पाकळ्या काढून टाकाव्यात. यामुळे तांदूळ खूप दिवस टिकतो.